Hot Widget

Type Here to Get Search Results !

शिवसेना-भाजपत वादंग

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईत करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असतानाच बेस्ट उपक्रमात १२ एप्रिलपासून सुरू असणाऱ्या सदस्य नोंदणी मोहिमेवरुन खळबळ सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने आणि भाजपने एकमेकांविरोधात अस्त्रे उपसली असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. बेस्ट उपक्रमात, ३० एप्रिलपर्यंत सदस्य मोहीम सुरू राहणार आहे. त्यात कोणत्या कामगार संघटनाकडे कामगारांची नोंदणी अधिक असेल, त्या संघटनेचे वर्चस्व निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर करोनाचा कहर लक्षात घेता ही सदस्य नोंदणी स्थगित करण्याची मागणी भाजपच्या गोटातून झाली आहे. मात्र, गेल्यावर्षापासून आपत्कालीन सेवा बजावत आहे. कित्येक कामगारांना करोनाची लागण झाली तेव्हा भाजपला त्याची आठवण का झाली नाही, असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे. सदस्य नोंदणीत कामगारांचा कल शिवसेनेच्या बाजूने असल्याने भाजपकडून विरोध सुरू असल्याचा आक्षेप घेतला आहे. मुंबईत करोनाचा प्रादूर्भाव सुरू असताना उपक्रमात सुरू असलेली कामगार सदस्य नोंदणी मोहीम तात्काळ स्थगित करण्याची मागणी बेस्ट समितीतील भाजपचे सदस्य गणेश खणकर यांनी केली आहे. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केलेल्या मागणीत त्यांनी करोनाचा संदर्भ देत सध्या नोंदणी करणे म्हणजे कामगारांचा जीव धोक्यात टाकण्यासारखा असल्याचे खणकर यांनी म्हटले आहे. आताच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर नोंदणीस परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad