Headlines
Loading...
जिलेटिनच्या कांड्या प्रदीप शर्मांनी दिल्या?

जिलेटिनच्या कांड्या प्रदीप शर्मांनी दिल्या?

जिलेटिनच्या कांड्या प्रदीप शर्मांनी दिल्या?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ गाडीतील स्फोटके अर्थात निवृत्त पोलिस अधिकारी यांनी आणून दिल्या होत्या, असा राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) संशय आहे. त्या दृष्टीनेच आता 'एनआयए'ने तपास सुरू केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळील गाडीत स्फोटके ठेवल्याप्रकरणी; तसेच या गाडीचे मालक असलेले मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी निलंबित सह पोलिस निरीक्षक यांची 'एनआयए'कडून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात 'एनआयए'चा मोर्चा आता प्रदीप शर्मा यांच्याकडे वळला आहे. शर्मांचा या कटात सहभाग असून, ते वाझेंच्या सातत्याने संपर्कात होते, असे 'एनआयए'च्या सूत्रांचे म्हणणे आहे. 


'एनआयए'तील सूत्रांनुसार, या घटनेच्या आधी प्रदीप शर्मा व वाझे हे सातत्याने संपर्कात होते. शर्मा यांना अशा प्रकारे कट शिजत असल्याची पूर्ण माहिती होती. त्यासाठी त्यांनीच या कांड्या वाझे यांना उपलब्ध करून दिल्या, असे दिसून येत आहे. ही घटना उजेडात आल्यानंतरही एक ते तीन मार्चदरम्यान शर्मा व वाझे हे सातत्याने संपर्कात होते. वाझेंच्या सीआययू कार्यालयातदेखील शर्मा आले होते. तिथेच या दोघांनी हिरेनला बोलवून जामिनासाठी अर्ज कसा करायचा, हेदेखील सांगितले. याखेरीज शर्मा व वाझे हे याच कालावधीत सातत्याने अंधेरी-चकाला भागात भेटत होते, असे तपासात समोर येत आहे. 


आणखी एक पथक मुंबईत संबंधित प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयदेखील तपास करीत आहे. या तपासासाठी सीबीआयचे आणखी एक पथक बुधवारी रात्री मुंबईत दाखल झाले. चौकशीचा आवाका मोठा असून, १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करायचा असल्याने आणखी पथक सीबीआयने मुंबईत धाडले आहे.

0 Comments: