Hot Widget

Type Here to Get Search Results !

तेलाचे दर चढेच

म. टा. प्रतिनिधी : एकीकडे करोना संकट असताना दुसरीकडे खाद्यतेल सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. तेलबिया तसेच तयार तेलाच्या आयातीचे गणित बिघडून दर महागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. देशाच्या एकूण खाद्यतेल मागणीत मुंबईचा वाटा १५ टक्के असतो. मुंबईत उपनगरातील लोकसंख्या खूप अधिक असल्याने येथे प्रामुख्याने हॉटेल व रेस्तराँची तेलाची मागणी भरपूर असते. हॉटेल व रेस्तराँमध्ये प्रामुख्याने पामतेलाचीच मागणी असते. त्यामुळे देशाच्या एकूण आयातीपैकी सुमारे ४५ टक्के पामतेलाची आयात ही मुंबईतच होते. सध्या करोना संबंधी निर्बंधांमुळे हॉटेल, रेस्तराँ व स्टेशनलगत तसेच रस्त्यावरील खाद्यान्नाचे स्टॉल्स बंद आहेत. त्यामुळे तेलाची मागणी घटली आहे. तसे असले तरी मुंबईत सर्वत्र खाद्यतेल १५० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. याबाबत अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले, 'पामतेलाची मागणी खूप कमी झाली आहे. ही मागणी कमी होण्याआधीच पामतेलाची मुंबईतील आयातही कमी झाली होती. त्याचवेळी दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक मागणी असलेल्या सोयाबीन तेलाची अर्जेंटिना व ब्राझिलहून होणारी आयातही घटली आहे. त्यामुळेच खाद्यतेल महागले आहे.' मुंबईत खाद्यतेल महागण्याचे दुसरे कारण नागरिकांमधील भीती, हेदेखील आहे. करोना संकटामुळे पूर्ण लॉकडाऊन लागणार, धान्य-किराणा मिळणार नाही, या भीतीपोटी नागरिकांनी एप्रिल महिन्यात सुरुवातीपासून गरजेहून अधिक खाद्यतेल खरेदी केली आहे. परिणामी मुंबईत सध्या मागणी व उपलब्धता यांत १५ टक्क्यांची तूट आहे. त्यातूनच दर वधारले आहेत. (रुपये प्रति लिटर) प्रकार जानेवारी मार्च सध्या पाम ९०-९५ १००-१०५ ११०-११५ सोयाबीन १०५-११० १२५-१३० १४५-१५० सूर्यफूल ११५-१२० १३५-१४० १६५-१७५ शेंगदाणा १२५-१५५ १३५-१८५ १७५-२१५ राइसब्रान १०५-११० १२०-१२५ १३५-१४०
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad