Headlines
Loading...
सीबीआयने मागितली 'अँटिलिया'संबंधी कागदपत्रे

सीबीआयने मागितली 'अँटिलिया'संबंधी कागदपत्रे

सीबीआयने मागितली 'अँटिलिया'संबंधी कागदपत्रे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई माजी गृहमंत्री यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करत असलेल्या सीबीआयच्या पथकाला आरोपी यांची चौकशी करण्याची विशेष एनआयए न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर या पथकाने आता '' प्रकरणाची कागदपत्रे मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. वाझेंची एनआयए कोठडी आज, शुक्रवारी संपत असल्याने त्यांना पुन्हा एनआयए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 


त्याचवेळी या अर्जावरही सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयकडून देशमुख यांच्या विरोधातील आरोपांची प्राथमिक चौकशी सुरू आहे. सीबीआयला ही चौकशी १५ दिवसांत पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. देशमुख यांनी कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले, असा गंभीर आरोप माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला आहे. तसेच, सचिन वाझे व संजय पाटील या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी दिलेल्या माहितीचा त्यासाठी आधार दिला. या पार्श्वभूमीवर, एनआयएच्या कोठडीत असलेले वाझे यांची चौकशी करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज सीबीआयने केला होता.


तो विशेष न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी बुधवारी मान्य करून एनआयएच्या कोठडीत असतानाच वाझेंची चौकशी करण्याची परवानगी सीबीआयला दिली. 


...तर चौकशीस मदत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेले वाहन उभे करण्याच्या कटाच्या प्रकरणातील कागदपत्रे मिळण्यासाठीही सीबीआयने आता अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची कागदपत्रे मिळाली तर त्याआधारे वाझेंची चौकशी करण्यात आम्हाला मदत होईल, असे सीबीआयने आपल्या अर्जात नमूद केले आहे.

0 Comments: