Fadnavis will meet Sharad Pawar: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवार यांची भेट

Fadnavis will meet Sharad Pawar: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवार यांची भेट
मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते (Devendra Fadnavis) हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याचे समजते. मात्र ही भेट राजकीय नसून पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असणार आहे. शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात पित्ताशयाशी संबंधित आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्या दरम्यान फडणवीस पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

(Opposition leader Devendra Fadnavis will meet NCP president ) देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसांमध्ये शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे समजते. दरम्यान, २९ मार्च या दिवशी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शरद पवार यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. 'श्री. शरद पवारजी यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत कळले. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो,' असे ट्विट फडणवीस यांनी केले होते. याबरोबरच फडणवीस यांनी पवार यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरजार टीकास्त्र सोडले आहे. 


सरकारची धोरणे, मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे, तसेच कथित लैंगिक अत्याचाराचे आरोप आणि राज्यातील करोनाची स्थिती अशा मुद्द्यांवरून फडणवीस यांनी सतत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, राजकारण आणि राजकीय नेत्यांशी असलेले संबंध आणि आजारापणात राजकारण बाजूला ठेवत फडणवीस यांनी पवारांची भेट घेण्याचे औदार्य दाखवत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. 


क्लिक करा आणि वाचा- देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील ट्विट केले होते. 'शरद पवार साहेबांची प्रकृती अचानक बिघडल्याचे वृत्त कळले. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्यांनी लवकरात लवकर रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावे,' असे ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. 
Tags

Post a comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.