Headlines
Loading...
बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सुरु केलं देशातील पहिलं 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र'

बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सुरु केलं देशातील पहिलं 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र'

मुंबई: वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे करोना लसीकरण सुलभ व्हावे, या हेतूने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने परिसरात देशातील सर्वांत पहिले सुरू करण्यात आले आहे. दादरच्या कोहिनुर स्क्वेअरच्या पार्किंग लॉटमध्ये सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे लोकार्पण खासदार यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दिव्यांग नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचुन लस घेणे जिकीरीचे ठरत आहे. यावर उपाय म्हणून पालिकेच्या वतीने ड्राईव्ह इन करोना लसीकरण केंद्राची संकल्पना मांडण्यात आली. या लसीकरण केंद्रावर नागरिकांना त्यांची स्वतःची गाडीत यायचं आहे. तसंच, गाडीतून न उतरता त्यांना लसीचा डोस दिला जाणार आहे. त्यानंतर काही वेळानं त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे गाडी नाहीये त्यांच्यासाठी शिवसेनेकडून गाडीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेणेकरुन नागरिकांना लसीकरण केंद्रावर वाट पाहावी लागणार नाही. वाचाः दादरच्या या केंद्रातील ड्राईव्ह इन सुविधेचा लाभ दिवसाला सुमारे २५० गाड्यांमधील नागरिक घेऊ शकतील. आता याठिकाणी केवळ ४५ वर्षांवरील आणि दिव्यांग नागरिकांसाठीच ही सुविधा उपलब्ध असून लवकरच १८ वर्षांवरील सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा मानस आहे. वाचाः कोहिनुर पार्किंग लॉट मधील या केंद्रात ड्राईव्ह इन लसीकरण सुविधे व्यतिरिक्त असलेल्या ७ बूथच्या माध्यमातून दिवसाला ४ हजार नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिकांना सहजतेने लसीकरण करता यावे, यासाठी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अशाच रीतीने मुंबईतील विविध ठिकाणी मोठ्या पार्किंग लॉट मध्ये अशीच सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

0 Comments: