Hot Widget

Type Here to Get Search Results !

संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला: थोरातांचे गाव म्हणून गप्प बसलात का?; भाजपचा सवाल

मुंबई: संगमनेरमध्ये गर्दीला पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं केलेल्या हल्ल्यावरून भारतीय जनता पक्षानं महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा भडिमार केला आहे. 'नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणे हा त्यांचा गुन्हा आहे का? तुमचे गृहखाते टोपी पाहून कारवाईचा निर्णय घेते का की महसूलमंत्री यांचं गाव आहे म्हणून गप्प बसला आहात?,' अशा प्रश्नांची सरबत्तीच भाजपचे प्रवक्ते यांनी केली आहे. (Keshav Upadhye Questions Maha Vikas Aghadi Government) केशव उपाध्ये यांनी या संदर्भात सविस्तर ट्वीट करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना धारेवर धरलं आहे. पुण्यात एका तडीपार गुंडानं पोलिसाचा केलेला खून आणि नागपूरजवळ टोली येथे अवैध दारूधंद्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचीही उपाध्ये यांनी यानिमित्तानं आठवण करून दिली आहे. शिवसेनेचे खासदार , व यांनी उपाध्ये यांनी सुनावलं आहे. वाचा: 'संगमनेरमध्ये गर्दी करू नका सांगणाऱ्या पोलीसावर जमावाने काल हल्ला केला. पण अजूनही पोलिसांचा अपमान झाल्याचा साक्षात्कार संजय राऊत यांना कसा झाला नाही? हल्लेखोर कोण हे पाहून टोपी फिरवली की काय?,' अशी विचारणा उपाध्ये यांनी केली आहे. 'पोलिसांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान मानता ना? मग या महाराष्ट्रात, दररोज महाराष्ट्राचा अपमान होत आहे. दिवसागणिक पोलिसांवर हल्ले होत आहेत, भर दिवसा पोलिसांचे मुडदे पाडले जात आहेत, महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेनं झुकत आहे, आणि तुम्ही मात्र मूग गिळून गप्प बसला आहात. कुठे गेली तुमची अस्मिता? पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत अशा घोषणा तुम्ही बंद खोलीत कॅमेऱ्यासमोर बसून केल्या होत्या. त्या एवढ्यातच कसे विसरलात? धोरणलकवा आणि निर्णयलकव्यात गुरफटलेलं सरकार पोलिसांना संरक्षण देणार की त्यांच्यावर होणारे हल्ले षंढपणानं पाहात बसणार?,' अशी विचारणा उपाध्ये यांनी केली आहे. संगमनेरातील गुन्हेगारांवर कारवाईच्या नावाखाली पांघरूण घालण्याचे षडयंत्र रचले जाणार असेल तर त्याचा जाब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागेल. संगमनेरमध्ये करोना नियमांचे धडधडीत उल्लंघन झाले तरी कारवाई झालेली नाही. नानाजी पटोले, तुम्ही बाळासाहेब थोरातांचे गाव म्हणून गप्प बसलात काय?,' असा टोलाही त्यांनी हाणला आहे. वाचा:
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad