Headlines
Loading...
नाहीतर लोकशाही संपली असं जाहीर करा: राष्ट्रवादी काँग्रेस

नाहीतर लोकशाही संपली असं जाहीर करा: राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत झालेल्या भाजपच्या पराभवानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेते व मंत्र्यांनी भाजपवर खोचक शब्दांत टीका केली होती. अन्न व नागरी पुरवठामंत्री () यांनी देखील मोदी आणि भाजपचा करिष्मा संपल्याचं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Chandrakant Patil) यांनी भुजबळ यांना सूचक शब्दांत इशारा दिला होता. त्यावरून आता दोन पक्षांमध्ये जुंपली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (Nawab Malik) यांनी पाटलांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. वाचा: ... पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. तसंच, मोदींची लोकप्रियता घटल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर पाटील यांनी छगन भुजबळ यांना जामिनावर सुटला आहात अशी धमकी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर मलिक यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 'आजपर्यंत भाजपकडून तपास यंत्रणांचा दुरुपयोग झाल्याचं सिद्ध झालं आहे. आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतंय की काय, असं वाटू लागलं आहे. छगन भुजबळ यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे, असा सवाल मलिक यांनी केला. चंद्रकांत पाटील अशा पद्धतीनं बोलत असतील तर न्यायालयानं सुमोटो अंतर्गत कारवाई करावी, अशी अपेक्षा नवाब मलिक यांनी केली आहे. 'न्यायालयसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी, अशी आग्रही मागणी मलिक यांनी केली आहे.

0 Comments: